Sajan Bendre

Artist Biography

He is a Marathi singer. He has sung over a thousand songs. If words and melodies come together, Maharashtra can be made to move. This has been proved by two siblings from Ichalkaranji, known as Manchester of Maharashtra. The brothers are Siddhahast lyricist Sagar Bendre and Sajan Bendre who has a magical voice. Bol Mai Halgi Bajau kya (बोल मैं हलगी बजाऊँ न्या)…. Mala Amdaar jhya sarkha watay ” …, मला आमदार झाल्यासारखं वाटतयं…. The feet of the youth of Maharashtra are trembling at this song. Both these songs belong to these two siblings. “Bol Mein Halgi Bajaun Kya” या This song played during Ganeshotsav has got 1 crore 16 lakh views in just six months. So, I feel like I became an MLA two months ago. This song has maintained its magic on social media by getting 26 lakh views. The Bendre brothers’ song is played 40 to 45 times a day on the music channel Nas. Even so, the steps of both siblings are on the ground.

Sagar Bendre enjoys writing folk songs naturally. Sajan Bendre has an amazing voice. Both these brothers are serving Maharashtra today through art. The family came to Ichalkaranji from Solapur district for work. Sagar and Sajan Bendre’s father started working on the Handloom machinery. Both the children started educating their families. But both of them, who love singing, also cultivated their art. Sagar used to compose songs and Sajan used to sing songs . This is his daily routine. He used to be present in school bands, bhajans, jagar-gondhals. On a cassette, he heard Chandan Kamble’s songs and at the same time considered a person he had never met or seen as his guru. An intense desire to meet the Guru forced him to go to Pune, he continued to search for Guru. Then they got the address of their Guru and they reached Guru’s house. Guru Chandan Kamble embraced him with his heart and gave him a chance in “Lakhabai Ali Wadya” in his first song in Tuljapur. They both deal with their confidence as they choose to embark on their play activities. On this occasion, the two brothers got another musician, Guru Saathi. Together, the three of them composed the Bhima song while playing the Bhima song to the DJ. This song took them to the pinnacle of success. After that, he wrote and sang many songs like “Shalu Nach Nach”, “Shalu Nachya Lagli Shalu, Vajatay Dhangalang Taklang.

This song made the youth sway during Ganeshotsav. In just six months, the song has been making waves on social media. Gained 1 crore 16 lakh views. Various channels started playing this song. What is special is that this song is being played 40 to 45 times a day on NaavRatri music channel. This song is special. Many records of Marathi songs have been surpassed by this song. “Jawa baghtis tu majhya kad..Mala Amdar Jhyala Sarkh Watay”, this song is currently being played in Maharashtra. In just two months, 2.6 million viewers have liked it through YouTube. Many new songs by Sagar and Sajan Bendre are coming now. Seeing the popularity of the song, director Nilesh Aher’s film is coming. The film will have a song by Sagar. The village of Kharda in Nagar district was ablaze. This song has been filmed. Despite reaching the pinnacle of success, Sagar and Sajan have strong ties with their Kolhapur district and Ichalkaranji. Their feet are still on the ground today. Many new songs to your visit – Many songs by Sagar Bendre Sajan and Vishal Sangeet are coming soon.”Jawa baghtis tu majhya kad..Mala Amdar Jhyala Sarkh Watay”. Also, this is my first time watching these songs in Maharashtra. We will soon give the best songs to the rasik listeners. There is a huge response from the youth. Rasik artists from Maharashtra should give us the opportunity to do the same, said lyricist Sagar Bendre.

साजन बेंद्रे: Marathi Information

हे एक मराठी गायक आहेत. त्यांनी हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. शब्द आणि सुरांची गट्टी जमली तर अवघ्या महाराष्ट्राला डोलावयास लावता येते. हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील दोन भावंडांनी सिध्द करुन दाखवले आहे. सिध्दहस्त गीतकार सागर बेंद्रे आणि जादुई स्वर लाभलेला साजन बेंद्रे अशी या भावंडांची नावे आहेत. बोल मैं हलगी बजाऊँ न्‌या…, मला आमदार झाल्यासारखं वाटतयं.. या गीतावर महाराष्ट्रातील युवकांचे पाय सध्या थिरकत आहेत. ही दोन्ही गीते या दोन्ही भावंडांचीच आहेत. बोल मैं हलगी बजाऊँ न्‌या…गणेशोत्सवात वाजलेल्या या गाण्याने अवघ्या सहा महिन्यात 1 कोटी 16 लाख व्ह्युज मिळविले आहेत. तर दोन महिन्यापूर्वी आलेल्या मला आमदार झाल्यासारखं वाटतयं या गाण्याने 26 लाख व्ह्युज मिळवत सोशल मिडियावर आपली जादू कायम ठेवली आहे. नस या संगीत चॅनेलवर दिवसातून 40 ते 45 वेळा बेंद्रे बंधूंचे गाणे वाजत आहे. असे असले तरी दोन्ही भावंडांची पावले जमिनीवर आहेत….

निसर्गतगत:च लोकगीते लिहिण्याची आवड सागर बेंद्रेला लाभले आहे. तर अफलातून आवाज साजन बेंद्रे याच्याकडे आहे. ही दोन्ही भावंड आज महाराष्ट्राची कलेच्या माध्यमातून सेवा करीत आहेत. कामानिमित्त सोलापूर जिल्ह्यातून हे कुटूंब इचलकरंजीत आले. सागर आणि साजन बेंद्रेचे वडील यंत्रमागावर काम करुन संसाराचा गाडा चालवू लागले. दोन्ही मुलांनीही आपल्या कुटूंबाला हात लावत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. परंतु गायनाची आवड असलेल्या या दोघांनीही आपली कला जोपासली. सागर गाण्यांच्या चाली रचायचा आणि साजन त्या चालीवर गाणी म्हणायचा. असा यांचा रोजचा दिनक्रम. शाळेचा बॅण्ड, भजनाचा आवाज, जागर-गोंधळ अशा सगळ्या ठिकाणी त्यांची उपस्थिती ठरलेली असायची. एका कॅसेटवर त्यांना चंदन कांबळे यांची गीते ऐकावयास मिळाली व त्याच वेळी त्यांनी कधी न भेटलेल्या व न पाहिलेल्या व्यक्तीला आपला गुरु मानला. गुरुला भेटण्याची प्रखर इच्छेने त्यांना पुण्याला जावयास भाग पाडले. पुण्यामध्ये एका हॉटेलात कफ विसळत त्यांनी गुरुचा शोध सुरुच ठेवला. त्यानंतर त्यांना आपल्या गुरुचा पत्ता मिळाला आणि त्यांनी गुरुचे घर गाठले. चंदन कांबळे या गुरुंनी त्यांना हृदयाशी कवटाळले आणि त्यांना लखाबाई आली वाड्याला या तुळजापूरातील पहिल्या गाण्यामध्ये संधी दिली. दोघांनीही मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांचा गायिकेचा प्रवास सुरु झाला. यानिमित्ताने या दोन्ही बंधूंना आणखी एक संगीतकार गुरु साथीला मिळाला. या तिघांनी मिळून भिमाचं गाणं डीजेला वाजतयं… या भीमगीताची निर्मीती केली. या गीताने त्यांना यशोशिखरावर नेले. त्यानंतर शालू नाच नाच, नाचायला लागली शालू, वाजतयं ढंगळांगऽ टकळांगऽ अशी अनेक गाणी त्यांनी लिहिली व गायिली.

बोल मैं हलगी बजाऊँ न्‌या… :

या गाण्याने गणेशोत्सवात युवकांना डोलावयास लावले. पाहता पाहता अवघ्या सहा महिन्यात सोशल मिडियामध्ये या गाण्याने धुमाकूळ घातला. 1 कोटी 16 लाख व्ह्युज मिळविली. विविध चॅनेलनी हे गाणे वाजवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे 9÷नस या संगीत चॅनेलवर हे गाणं दिवसातून तब्बल 40 ते 45 वेळा आज वाजत आहे. हे या गाण्याचे विशेषच म्हणावे लागेल. मराठी गाण्यांचे अनेक रेकॉर्डस्‌ या गाण्याने केंव्हाच मागे टाकली आहेत. जवा बघतिस तु माझ्याकडं…. मला आमदार झाल्यासारखं वाटतयं, हे गाणं सध्या महाराष्ट्रात वाजत आहे. अवघ्या दोन महिन्यात 26 लाख प्रेक्षकांनी यु-ट्युबच्या माध्यमातून याला पसंती दिली आहे. अनेक नवीन गाणी आता सागर व साजन बेंद्रे यांची येत आहेत. गाण्याची लोकप्रियता पाहून दिग्दर्शक निलेश आहेर यांचा दडपण चित्रपट येत आहे. या चित्रपटात सागरचे गाणे असणार आहे. नगर जिल्ह्यातील खरडा या गावामध्ये झगमगाय लागलयं…. या गाण्याचे चित्रीकरण झाले आहे. यशोशिखर गाठत असतानाही सागर आणि साजन या दोघांचं नातं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याशी व इचलकरंजीशी घट्ट आहे. त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत. अनेक नवीन गाणी आपल्या भेटीला – सागर बेंद्रे साजन व विशाल संगीत देत असलेली अनेक गाणी लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहेत. आमदार झाल्यासारखं वाटतयं त्याचबरोबर देखा हे पहली बार, ही गाणी सध्या महाराष्ट्रात वाजत आहेत. याहून सरस गाणी आम्ही रसिक श्रोत्यांना लवकरच देणार आहोत. युवकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. अशीच सेवा करण्याची संधी महाराष्ट्रातील रसिक कलाकारांनी आम्हाला द्यावी, असे गीतकार सागर बेंद्रे यांनी सांगितले.

ARTIST PHOTO

Sajan Bendre